ख्यातनाम पत्रकार चित्रा सुब्रमण्यम ड्यूएला यांचे
प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान पुण्यात होणार
पुणे:
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम पत्रकार चित्रा सुब्रमण्यम ड्यूएला या सेनापती बापट रस्त्याजवळील भारतीय विद्या भवन सभागृहात शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘माध्यमे, समाज आणि प्रशासकीय कारभार’ या विषयावर ७वे प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान देणार आहेत.
प्रकाश कर्दळे फ्रेंडस् फोरमच्या वतीने प्रख्यात पत्रकार आणि द इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे आवृत्तीचे माजी संपादक असलेल्या कै. श्री. प्रकाश कर्दळे यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते. अरुणा रॉय, अरविंद केजरीवाल,विनिता कामटे, शैलेश गांधी, किरण बेदी, अण्णा हजारे, राजदीप सरदेसाई आणि एन. राम या पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील दिग्गजांनी यापूर्वी पुण्यात येऊन प्रकाश कर्दळे स्मृती व्याख्याने दिली आहेत.
कायद्याच्या अभ्यासिका, २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी झुंजताना शहीद झालेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्त कै. अशोक कामटे यांच्या पत्नी आणि या माहिती अधिकाराचा वापर करून हल्ल्याबाबतचे सत्य शोधून त्यावर लिहिलेल्या ‘टू द लास्ट बुलेट’ पुस्तकाच्या लेखिका विनिता कामटे याप्रसंगी प्रमुख पाहुण्या असतील.
भारतातील दिग्गज पत्रकार असलेल्या चित्रा सुब्रमण्यम या बोफोर्स घोटाळयाच्या तपासात अग्रस्थानी होत्या. या घोटाळ्यामुळे १९८९मध्ये तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. स्वित्झर्लंड येथील सीएडडी कन्सल्टिंगच्या त्या संस्थापिका आहेत. भारतात आणि युरोपात तब्बल तीन दशके शोधपत्रकारिता करत असताना चित्रा सुब्रमण्यमयांनी स्वत: अनेक धोक्यांच्या सामना केलेला असून त्यांनी फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धोका व्यवस्थापन, गुंतागुंतीच्या वाटाघाटी याबाबत तर विविध आंतरराष्ट्रीय संघटनांना जागतिक पातळीवरील वेगवेगळ्या कारणांसाठी अभियाने राबवण्यासाठी मदत केलेली आहे. जगात महत्वाकांक्षा वाढत आणि स्रोत कमी होत असतानाच आपण सर्वजण घसरत्या विश्वासार्हतेला बळी पडत आहोत असा त्यांच्या विश्वास आहे.
दक्षिण आशियातील कर्तृत्ववान महिलांच्या सूचीमध्ये स्थान मिळवलेल्या चित्रा सुब्रमण्यम यांना अनेक सन्मानांनी गौरवले गेले आहे. यामध्ये पत्रकारितेतील गुणवत्तेसाठीचा बी. डी. गोएंका पुरस्कार, सर्वोत्तम भारतीय महिला पत्रकारासाठीचा चमेली देवी पुरस्कार आणि पत्रकारितेतील सर्वांगीण कामगिरीसाठीचा द हिंदू पुरस्कार यांचा समावेश आहे. ‘इंडिया फॉर सेल’ आणि ‘बोफोर्स: द स्टोरी बिहाईंड द न्यूज’ यासह अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली असून त्यांच्या पुस्तकांचे स्वीडिश, मल्याळम आणि मराठी भाषांमधील अनुवाद देखील प्रकाशित झालेले आहेत.
कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात तब्बल चाळीस वर्षांची कारकीर्द गाजवली. ते द इंडियन एक्स्प्रेसच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून १९८९ ते २००० याकाळात कार्यरत होते. त्यानंतर २००७पर्यंत द इंडियन एक्सप्रेस मध्ये वरिष्ठ संपादक (एक्सप्रेस इनिशिएटिव्हज) या पदावर काम करताना त्यांनी माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यासाठी विपुल प्रमाणात लेखन केले आणि नागरिकांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या.
अत्यंत विश्वसनीय, विचारप्रवर्तक आणि विविध विषयांवरील प्रेरणादायी बातम्यांमुळे कै. श्री. प्रकाश कर्दळे यांची पत्रकार म्हणून स्वत:ची आगळीवेगळी ओळख होती. शोधपत्रकार म्हणून ते खूप गाजले होते. प्रत्येक पत्रकारात कुठेतरी एक कार्यकर्ता लपलेला असतो असा ठाम विश्वास असलेल्या कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीत एक्सप्रेस सिटीझन्स फोरम या जनतेच्या दबावगटाची निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक्सप्रेस सिटीझन्स फोरमने पुणे शहराला बंद नळाद्वारे पाणीपुरवठा, गणेशोत्सव मंडळांच्या मांडवाचे रस्त्यांवरील अतिक्रमण, पुणे कँटोन्मेंट भागातील बांधकाम नियमावलीचे उल्लंघन, लॉ कॉलेज टेकडी फोडून रस्ता बनवण्याचा प्रकल्प, रस्त्यांच्या बांधकामातील गुणवत्ता, अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे, कोरेगांव पार्क परिसरातील ड्रग्ज पार्ट्या, पाणी टंचाईमुळे होणारे ग्रामीण भागातील महिलांचे हाल अशा विविध विषयांना हाताळले.
कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी एक्सप्रेस सिटीझन्स वॉर मेमोरियल कमिटी स्थापन करून डिसेंबर १९९६मध्ये १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने मिळवलेल्या विजयाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी एक व्याख्यानमाला आयोजित केली. त्यातूनच नागरिकांच्या पुढाकाराने पुण्यात एक राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवण्याच्या संकल्पनेने जन्म घेतला. दिनांक १५ ऑगस्ट १९९८ रोजी राष्ट्रार्पण झालेले हे मोरवडा येथील स्मारक नागरिकांच्या सहभागाने बनलेले आणि जेथे स्वातंत्र्योत्तर सर्व शहिदांची नावे संगमरवरी पाट्यांवर कोरलेली आहेत असे दक्षिण आशियातील पहिलेच युद्धस्मारक आहे. कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी १७७९मध्ये वडगांव येथिल लढाईत मराठा सैन्याने इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाचे ‘भारतीय श्रेष्ठतेमध्ये अन्य कुणापेक्षाही उणे नाहीत’ या संकल्पनेवर आधारित स्मारक उभारण्यात देखील मोलाची भूमिका बजावली. श्री. अरुण फिरोदिया, डॉ. शां. ब. मुजुमदार यासारखे सन्मान्य नागरिक या स्मारक समितीचे सदस्य होते.
सन २००० नंतर कै. श्री. प्रकाश कर्दळे यांनी स्वत:ला माहितीच्या अधिकाराच्या प्रसारासाठी वाहून घेतले होते. त्यासाठी त्यांनी राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कार्यकर्त्यांबरोबर काम करत चळवळीची बांधणी केली. केंद्रीय माहिती अधिकार कायद्याचा मसुदा बनवण्यात देखील त्यांचा सहभाग होता. माहिती अधिकार चळवळीतील श्री. अण्णा हजारे, श्री. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना आणि माहिती आयुक्तांना त्यांनी वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले होते. कारभारातील पारदार्शितेसाठी कायद्याच्या वापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी राज्यात ठिकठीकाणी अनेक कार्यशाळांचे आयोजन केले. त्यांनी माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांना आपापसात वैचारिक चर्चा करता यावी या उद्देशाने त्यांनी ‘हम जानेंगे’ या इंटरनेट ग्रुपची देखील निर्मिती केली.
-----------
Chitra
Subramaniam Duella to speak in Pune
at
The 7th Prakash Kardaley Memorial Lecture
Pune:
Internationally acclaimed
journalist Chitra Subramaniam Duella will speak on ‘Media, Society and
Governance’ at the 7th Prakash Kardaley Memorial Lecture at the
Bharatiya Vidya Bhavan Hall, off Senapati Bapat Road at at 6 p m on
Saturday, August 23, 2014.
Organised by the
Prakash Kardaley Friend’s Forum, The Prakash Kardaley Memorial
Lecture is one of the most prestigious annual lectures being held in the city
in memory of Late Mr. Prakash Kardaley, a doyen of journalism and former Editor
of The Indian Express, Pune. Eminent speakers who have given this
memorial lecture in the past include Aruna Roy, Arvind Kejriwal, Vinita Kamte, Shailesh Gandhi,
Kiran Bedi, Anna Hazare, Rajdeep Sardesai and N Ram.
Vinita Kamte, who is a law
graduate, wife of Late Ashok Kamte, the Additional Commissioner, Mumbai,
Eastern Region, who laid down his life while bravely fighting against the
terrorists in the 26/11 Mumbai Terror attack and author of the bestseller book `To
the last bullet' will be the chief guest at the occasion.
One of India’s prominent media
personalities, Chitra Subramaniam was the lead investigator in the Bofors-India
arms deal scam that contributed to the electoral defeat of former Prime
Minister Rajiv Gandhi in 1989. She is the Founder of CSD consulting,
Switzerland. With high end experience of working in media, communications and
advocacy at the highest levels in India and Europe for over three decades, she
has experienced personal risk as a journalist, managed risk for CEOs of Fortune
500 companies, assisted in complex multi-party negotiations, developed and run
global campaigns for international organisations and writes speeches and think
pieces for agenda-setters. She believes that in a world of growing ambitions
and shrinking resources we are all staring at a trust deficit.
Listed in the ‘’Who’s Who’’ of
south - Asian women, Chitra Subramaniam has been the recipient of several
prestigious awards including the B.D. Goenka Award for excellence in
journalism, Chameli Devi Award for the
best Indian woman journalist of the year and The Hindu award for outstanding
all-round performance in journalism. She has also authored books including
India is for Sale and Bofors: The Story Behind the News’’. Her books have been
translated into Swedish, Malayalam and Marathi.
Late Mr.
Prakash Kardaley, who had a 40 year stint with The Indian Express, was the
Resident Editor of the Pune Edition of The Indian Express from 1989 to 2000 and
later, as the Senior Editor (Express Initiatives) with The Indian Express, he
spread knowledge and awareness about Right To Information (RTI) through news
columns and citizen workshops until early 2007.
Late Mr. Prakash Kardaley’s
news stories were highly credible, innovative, thought-provoking and inspiring
for the people to wake up and do something about the issues he raised.
Investigative journalism had been his forte. A staunch believer of the
principal that every journalist must have a flare of activism in him, Late Mr.
Prakash Kardaley founded the Express Citizens Forum (ECF) in the
early 1990s and made it a very formidable citizen pressure group. The ECF picked
up issues related to environment; drinking water pipeline for Pune;
encroachment of pandals on public roads during Ganesh Festival; violation of
building byelaws in Pune cantonment; road development through the verdant Law
College Hill; poor construction of roads; plight of accident victims who do not
get help from citizens and hospitals; drug orgies in the backyards of Koregaon
Park; eliminating hardships of rural women during summer which brings in water
supply crisis, and many more.
He also formed the Express
Citizens’ War Memorial Committee, which held a lecture series to celebrate the
silver jubilee year of the victory of the Indo-Pak 1971 War in December 1996
and culminated in the birth of the idea of erecting a national war memorial
through civilian citizen initiative. The National War Memorial, which was
inaugurated on August 15, 1998, is the only one of its kind in South Asia
built through citizen contribution and has the names of all soldiers from
Maharashtra who laid down their lives in action since the country's
independence, engraved in marble.
Kardaley also played a
pioneering role in building the Wadgaon Victory Memorial with the theme
`Indians are second to none' off the old Pune-Mumbai highway to commemorate the
Battle of Wadgaon, 1779. Prominent citizens like Mr Arun Firodia and Dr S B
Mujumdar were Members of the committee that erected the victory pillar off this
highway.
Since the year 2000, he
totally devoted himself to the promotion of a law on Right To Information in
Maharashtra and in India and had been networking with activists at the state,
national and international levels. He was one of the silent participants in
drafting the national Right To Information Act and was the wisdom master for
prominent RTI activists in the country including Anna Hazare, Arvind Kejriwal
and information commissioners. He conducted several workshops for citizens on
the use of the transparency law in Maharashtra. He started the most popular and
well-respected RTIe-group called`Hum Janenge' which provides a common platform
for RTI advocates throughout the country to exchange information and share
experience.
Till the last minute of his
life, he was working like an ant for the society. He suddenly passed away on
July 15, 2007. The memorial lecture is a way of paying tribute to the man who
remained low profile and lived with the philosophy of `just do it.’
No comments:
Post a Comment